
हॉटेलवर छापा टाकून महिला पिडीतेची सुटका
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव- 03 जुलै 2025 विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग – सध्या चार्ज चाळीसगाव उपविभाग) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलीसांनी बसस्थानकाजवळील विनायक प्लाझा या हॉटेलवर धाड टाकली. सदर कारवाईत एक पीडित महिलेस वाचवण्यात पोलिसांना यश आले असून, दोन पुरुष आरोपी व एक महिला आरोपी अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्यातून पोलिसांनी कंडोम, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹43 हजार 20 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीसांनी यशस्वीपणे पार पाडली
हॉटेलमधून महिलेची सुटका
पोलिसांनी टाकलेल्या धाडमध्ये पोलिसांना येथे एक महिला आढळून आली. दरम्यान कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून संशयित आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.