A2Z सभी खबर सभी जिले की

आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत

समीर वानखेड़े चंद्रपूर महाराष्ट्र :
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं याकडे लक्ष लागलं आहे. अशातच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या फेसबुक पोस्टची सध्या चर्चा होत आहे. ‘आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे.’ असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून खासदार बाळू धानोरकर यांनी वाचवले. भाजपचे हंसराज अहिर यांचा पराभव करत राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार धानोरकर ठरले. मात्र त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. धानोरकर यांच्यानंतर चंद्रपूर लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा रंगली होती. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे. त्यांना भावी खासदार म्हणून कार्यकर्ते बघत होते. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. पाठोपाठ आमदार सुभाष धोटे यांनी ही स्पर्धेत असल्याचे वक्तव्य केले.

उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षात मोठी चढाओढ सुरू आहे. अशातच आमदार धानोरकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, बाळूभाऊंच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे. आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Related Articles

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!