
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
Ambernath Nagarpalika Election : अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 31 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार, एक अपक्ष असे एकूण 32 नगरसेवक एकत्र आले असून त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
मोठी बातमी! काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा झटका, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
Ambernath Nagarpalika Election
ठाणे : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अंबरनाथचं (Ambernath Nagarparishad Election) राजकारण सातत्याने चर्चेत आहे. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेने (Eknath Shinde Shivsena) मोठा धक्का दिला आहे. शिंदेंची शिवसेना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत (Ajit Pawar NCP) सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला असून एकूण 32 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे
Ambernath Nagarparishad Election : भाजपकडून या आधी सत्ता स्थापनेचा दावा
अंबरनाथमध्ये भाजपचे एकूण 16 नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आधी काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र वरिष्ठांकडून त्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला.
Ambernath Politics : श्रीकांत शिंदेंची खेळी, भाजपला शह
भाजपच्या या खेळीनंतर सर्वाधिक जागा निवडून आलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ उडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिंदेंचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खेळी करत अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं. शिवसेनेचे सर्व नगरसेवक ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे 27, अजितदादांचे चार आणि एका अपक्षाच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला असून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.
Ambernath Nagarparishad Election Result : अंबरनाथमधील पक्षीय बलाबल कसं?
शिवसेना शिंदे – 27
राष्ट्रवादी – 04
अपक्ष
भाजप – 16
काँग्रेस – 12 ( यातील 10 जण भाजपमध्ये गेले)
Ambernath Shivsena Vs BJP : अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत.