
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली. या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ‘करप्शन आणि कन्फुजनची’ युती असल्याची टीका केली होती. यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना या वृत्तपत्राला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.