A2Z सभी खबर सभी जिले कीलातूर

महाराष्ट्र.आज पासून दुमजली बस स्थानक खूले करणार

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हे’ दुमजली बसस्थानक आजपासून प्रवाशांसाठी खुले, मिळणार या भन्नाट सुविधा

लातूर रिपोर्टर.आतापर्यंत महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीचे अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णत्वास गेले आहेत. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाली आहे.पुण्यातही अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली असून या प्रकल्पांमुळे पुणे शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम बनली आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विकसित होत असलेले दुमजली बसस्थानक देखील आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. हे बसस्थानक विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे.

विमानतळावर ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याच सोयीसुविधा बारामती येथे तयार झालेल्या या बसस्थानकात प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिणामी या बसस्थानकाचा महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अलीकडेच विकसित झालेल्या या बस स्थानकाचे आजपासून अर्थातच 7 मार्च 2024 पासून कामकाज सुरू झाले आहे.

या अद्ययावत बस स्थानकाच्या कामासाठी 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. येथे विकसित करण्यात आलेल्या 22 प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी बसेस उभ्या राहू शकतात.

Related Articles

तसेच रात्रीच्या वेळी या बसस्थानकावर 80 बसेस मुक्कामाला ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांना बसण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मजवळ सीटिंग अरेंजमेंट आहे.

येथे प्रशस्त स्वच्छतागृह, कॅन्टीन, महिलांसाठी हिरकणी कक्ष, दुचाकी तथा चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा, दोन मीटिंग हॉल, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी दोन सुसज्ज सूट, वाहन व चालकांसाठी स्पेशल विश्रामगृह, बसस्थानकामध्ये ओपन आणि एक अंतर्गत अशा दोन कॅन्टीन आहेत, व्यावसायिक गाळे, इत्यादी सोयी सुविधा या बसस्थानकात तुम्हाला पाहायला मिळतील. या बसस्थानकावरून आज गुरुवारपासून अधिकृतरित्या वाहतूक सुरू झाली आहे.

Show More

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!