A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरे
Trending

प्रेस नोट राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रेस नोट राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रेस नोट
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नागपूर, दि. 28 : जिल्हयातील कार्यरत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी त्यांच्या शाळेतून, कनिष्ठ महाविद्यालयातून सन 2023-24 या सत्रातील फेबुवारी, मार्च 2024 मध्ये 10 वी, 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालुका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.
            जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी. आय समोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर येथे संपर्क साधावा.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!