
संजय पारधी बल्लारपूर
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील सन्मित्र सैनिकी विद्यालय मध्ये आयोजित विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन थाटात पार पडले शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी सन्मित्र मंडळाचे सचिव एडवोकेट निलेश चोरे विहिंप जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत,प्रांत मंत्री प्रशांत तितरे, सहमंत्री अमोल अंधारे बजरंग दलाचे प्रांत संयोजक नवीन जैन सहसंयोजक सुरज भगेवार यांची उपस्थिती होती
या शौर्य प्रशिक्षण वर्गात विदर्भ प्रांताच्या 26 जिल्ह्यातून 280 विद्यार्थी व 30 शिक्षक सहभागी झाले होत आहे या वर्गात विद्यार्थ्यांना नियुध्द,योगासने, परेड,प्राणायाम,व्यक्तिमत्व विकास आपत्कालीन व्यवस्थापन आदी प्रशिक्षणासह देशभक्तीवर वैयक्तिक सांघिक गीत कार्यक्रम ,देश, धर्म ,कला ,संस्कृती आदी विषयाची माहिती दिली जाणार आहे वर्गाचे मुख्य शिक्षक रवी दवे असून व्यवस्था प्रमुख म्हणून विनय मडावी सहप्रमुख विकास मंजरे अमित करपे व अनेक कार्यकर्ते जवाबदारी सांभाळत आहे अशी माहिती विहितपच्या प्रचार प्रसार विभागामार्फत देण्यात आली आहे.