
विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेलकामठी च्या १०० टक्के निकाल
कळमेश्वर तालुक्यातील विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेलकामठी ता.कळमेश्वर जि.नागपुर येथील १२ बोर्ड परीक्षेच्या १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक – किशोर नामदेवराव बनकर याला ८२.१७ टक्के,द्वितीय क्रमांक – कु.श्रुतिका रामदासजी घोळसे हिला ७८.६७ टक्के,तृतीय क्रमांक – कु.कोमल खुशालरावजी सातपुते हिला ७६.८३ टक्के मिळाले आहे.
या करीता विनोबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री ज्ञानेश्वर निघोट, विनोददादा मानकर (संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नागपुर),मुख्याध्यापिका बोचरे मॅडम,सागर निघोट सर, राजुरकर सर, हळदे सर,कुथे सर, कुकडे सर ,पाटील सर,पावनकर सर टेकाडे मॅडम ,गजभिये सर ,काळे मॅडम ,भालेराव मॅडम तसेच इतर कर्मचारी चंद्रकांत देशमुख,अभय बनकर, विनायक युवनाते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी करीता हार्दिक शुभेच्छा दिले आहेत.