
समीर वानखेडे महाराष्ट्र:
आजच्या जमान्यात सोशल मीडियाचा आजच्या पिढीवर एवढा प्रभाव आहे की त्यात काही अडथळे आल्यास संपूर्ण जगात खळबळ उडून जाते .फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे काल अशीच एक घटना घडली आहे.काल 5 मार्च च्या रात्री 8:30 वाजता फेसबुक अचानक मोबाईल आणि सर्व उपकरणांमधून लॉग आउट झाले आणि इंस्टाग्राम फीड देखील रिफ्रेश झाले नाही. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन होते. तांत्रिक बिघाडामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाउन झाले. त्याचा जगभरातील लाखो वापरकर्त्यांवर परिणाम झाला. अखेर रात्री 10.30 च्या सुमारास फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा कामाला लागले.
रात्री साडेआठच्या सुमारास फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन झाले. फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही ॲप्सवरून यूजर्स आपोआप लॉग आउट होत होते. मोबाइलवर सत्र कालबाह्य संदेश मिळाल्यानंतर फेसबुक खाते लॉग आउट झाले. यानंतर, लॉग इन केल्यानंतरही वापरकर्ते लॉग इन होत नव्हते. एक त्रुटी प्रदर्शित केली जात होती. अशी समस्या मेसेंजर आणि थ्रेड्समध्येही दिसून आली. जगभरातील अनेक वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागला. सायबर हल्ल्यामुळे फेसबुक बंद झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. अखेर तासाभरानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू झाले.
फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन झाल्यानंतर, अनेकांनी सर्वप्रथम तपासले ते त्यांचे मोबाइल नेटवर्क. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेकांनी क्रॉस चेकिंग केले. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर X वर मीम्सचा पाऊस पडला.