A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या संकल्पनेतून वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी पार्किंग लाईन आखल्या

.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या संकल्पनेतून वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी पार्किंग लाईन आखल्या

राहुरी पोलीस स्टेशन व राहुरी नगरपालिका यांनी वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी आखल्या पार्किंग लाईन

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मार्केटमध्ये वारंवार होणाऱ्या ट्राफिक जाम वर उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पोलीस विभागाने नगरपालिकेकडे विनंती करून पार्किंग लाईन आखून घेतले आहेत. यानंतर सदर पार्किंग रेषे बाहेर जे नागरिक वाहने लावतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. सर्व दुकानदार व्यापारी व्यावसायिक यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकाला सदर पार्किंग लाईन च्या आत मध्येच दुचाकी वाहने पार करण्याची समज द्यावी जेणेकरून विनाकारण होणारी ट्रॅफिक जाम टाळता येईल व येणाऱ्या ग्राहकांनाही विनाकारण दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागणार नाही. तसेच ग्राहकांच्या वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व दुकानदार व्यवसायिक यांनी आपल्या दुकानांसमोरचा एरिया सीसीटीव्ही मध्ये कव्हर होईल अशा अँगल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (जात वाहनाचा नंबर स्पष्ट दिसू शकेल अशा क्षमतेचे) बसवावेत जेणेकरून वाहन चोरीस प्रतिबंध होईल व वाहन चोरी गेल्यास त्याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात नगरपालिका मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांच्या समन्वयातून सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, HC अशोक शिंदे,विकास साळवे, रोहकले, गणेश लिपणे, शकुर सय्यद नगरपालिका स्वच्छ्ता निरीक्षक पवार यांच्या पथकाने केलेली आहे.

Related Articles

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!