
नाशिक प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला सोमवारी (ता. १९) सकाळी दिल्लीतील बी.डी. मार्गावर किरकोळ अपघात झाला. या खासदार गोडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी (ता. १९) जयंती असल्याने खासदार हेमंत गोडसे हे त्यांच्या इनोव्हा कारने (एमएच १५ एफसी ९९०९) बी.डी. मार्गावरून संसदेकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने (डीएल ७ सीडब्ल्यु २२०२) धडक दिली.
यात खासदार गोडसे यांच्या कारच्या पाठीमागील बाजुचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये खासदार गोडसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.