
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव | येथील मालेगाव वीज पॉवर कंपनी ही खासगी कंपनी अंदाचे आणि चुकीची अवास्तव वीजबिले नागरिकांना देत आहेत. तसेच वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीजबिले न भरल्यास दादागिरीने वीज पुरवठा खंडीत करीत आहेत.
वास्तविक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना, तसेच मंदीचे सावट असतांना ही सक्तीची वसुली त्वरीत थांबविण्यात यावीत, अशी मागणी सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव यांनी केली असून वीज बिले वसुली किंवा पुरवठा खंडीत करण्याचा कंपनीतर्फे प्रयत्न झाल्यास नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
मालेगाव पॉवर कंपनी ही मनमानी कारभार करत नागरिकांना चुकीचे रिडिंग असलेले खासगी कंपनी जणु काही ब्रिटीश काळातील ईस्ट इंडिया कंपनीसारखी आहे. अव्वाच्या सव्वा असे वीज बिले देवून नाहक त्रास देत आहे. नागरिक वीज बिल दुरुस्त करुन द्यावे, म्हणून तक्रार करण्यासाठी या खासगी कंपनीच्या कार्यालयात गेले तर बिहारी, उत्तरप्रदेश अशा प्रांतातील नोकर मंडळी दादागिरीची भाषा करुन त्यांना त्रास देत आहे. आधीच वीज कंपनीने एक एप्रिलपासून मोठ्या प्रमाणावर वीज दरवाढ केलेली आहे. ही दरवाढ म्हणजे गरीब, सामान्य, माणसांना जगणे मुश्किल करणारी ठरली आहे. त्यातच चुकीचे रिडिंग घेतले जात आहे. हजारो रुपयांची सरासरी बिलांची आकारणी करुन अंदाजे रकमा टाकून बिले दिली जात आहे. मालेगाव शहरात सर्वत्र मंदीचे वातावरण असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तालुकयावर दुष्काळाचा मोठ्या प्रमाणावर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत ही वीज कंपनी नागरिकांना खोटी बिले देवून त्यांचा छळ करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही दबावाल बळी न पडता अशी आवस्तव बिले दुरुस्त करुन दिल्याशिवाय भरु नयेत. वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सक्तीने वसुलीसाठी किंवा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी आल्यास त्वरीत आपल्याशी संपर्क (मो.नं. ९८२३३४२४४५) करावा, असे आवाहन ताराचंद बच्छाव यांनी केले आहे.