A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

महाराष्ट्र. इंस्टाग्राम वर रील बनवणे पडले महागात….

इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात

लातूर रिपोर्टर.सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरु असुन पोलीस विभागाकडून समाज माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे.

त्यातच इंस्टाग्रामवर धारदार शस्त्र बाळगून रील बनवणाऱ्या एकावर व इंस्टाग्रामवर धारदार तलवार बाळगून प्रदर्शन करणाऱ्या एका अशा दोघा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी इंस्टाग्राम, व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांवर पोलीस विभागाकडुन करडी नजर ठेवली जात आहे.

त्यातच इंस्टाग्राम वर घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करून रील बनवणाऱ्या अमोल सुधाकर बिरादार (रा.वलांडी, ता.देवणी) यास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारदार चाकू जप्त केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, राम बनसोडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले यांचा समावेश होताउपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या पथकाने रविवारी (ता.२४) रोजी इंस्टाग्राम वर फोटो ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या राजकुमार ज्ञानोबा आलावाड (रा.गोपाळ नगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन तलवारी व एक कोयता जप्त केला आहे.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री कुलकर्णी, श्री केंद्रे, श्री बिरादार, श्री गेडाम, राहुल गायकवाड यांचा समावेश होता. महाराष्ट्र अधिनियम कायदे अंतर्गत दोघांवरील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles
Show More

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!