
📍नवी मुंबई..
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
प्रभाग क्रमांक १५ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. मंदाताई देविदास भोईर व श्री. देविदास रामदास भोईर (राष्ट्रवादी पुरस्कृत) यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा पार पडली.
या पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील मूलभूत समस्या,विकासकामांची दिशा तसेच भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा मांडण्यात आला नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांना या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
जनतेच्या विश्वासावर आधारित विकासाचे राजकारण करण्याची ठाम भूमिका असलेले हे उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहतील, lअसा मला पूर्ण विश्वास आहे. परिवर्तनासाठी नवी मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांना भक्कम पाठबळ द्यावे, ही विनंती केली..