
प्रतिनिधी : अनिकेत मशिदकर, उमराणे : कळवण डेपोची सकाळी ९ वाजता उमराणेमार्गे मालेगाव जाणाऱ्या बस वाहक चालक यांनी ३ किमी वर खारीफाटा येथेच उतरवून दिल्याने व परस्पर मालेगाव बस नेल्याने विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत.
उमराणे येथे १०वी १२वी क्लासेस तसेच कॉप्युटर क्लासेस ला येणाऱ्या शनिवारी दहिवड खारीपाडा येथील विद्यार्थीनिना उतरून दिल्याने पायी यावे लागले. मालेगाव व कळवण आगारातील उमराणे मार्गे मालेगाव, देवळा, कळवण ला जाणाऱ्या सर्व बस पूर्ववत उमराणे मार्गे सुरु करण्यात याव्यात. अशी मागणी श्री चिंतामणी उत्तम नागरिक संघ, प्रेस क्लब ज्येष्ठ नागरिक उमराणे यांच्या वतीने करण्यात आली आहे. पाच सहा महिन्यापूर्वी खारीफाटा ते उमराणे रस्त्याचे काँकर्टीकरण काम सुरु होते त्यामुळे उमराणे मार्गे जाणाऱ्या बसेस बंद होत्या. काम पूर्ण होऊन २ महिने झाले तरीही बसेस परस्पर देवळा फाट्यावरून निघून जात आहेत. वेळोवेळी मागणी करूनही आ. राहुल आहेर यांनी सूचना देऊनही ग्रामपंचायतिने पत्र देऊनही मागणी पूर्ण झाली नाही. देवळा तालुक्यातील सर्वांत मोठे बाजार पेठेचे गाव असून येथे मोठी कांदा, भुसार मालाची बाजारपेठ असल्याने व्यापाऱ्यांची रोज बैंक कामासाठी मालेगांव देवळा ये-जा करत असत तसेच उमराणे येथून बहुंताश विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी देवळा, मालेगाव, सौदाणे, मुंगसे येथे जात असतात. मालेगाव कळवण जाणाऱ्या बसेस पूर्ववत उमराणे मार्गे सुरु करण्यात याव्यात. सदर बसेस पूर्ववत झाल्यास विद्यार्थ्याचीं नागरिकांचीं व नोकरदार, भाजीपाला विक्रीसाठी मालेगावला देवळा कळवण ला जाणाऱ्या शेतकऱ्यांचीं गैरसोय दूर होईल.
तरी लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी पत्रकार विनोद पाटणी, उत्तम नागरिक संघटनेचे चिंतामण मगर, उत्तमराव देवरे केदाअण्णा देवरे, प्रदीप शिरुडे, नितीन जाधव, पुंडलिक गायकवाड, मुरलीधर देवरे, सुभाष बाफना, जयवंत पाटील, शरद जाधव, हिरामण देवरे, अशोक देवरे आदींनी केली असून त्वरित सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
.