
डोंबिवली पूर्व रामनगर पोलीस ठाणे, ऐसीपी कार्यालयाजवळ स्वामी समर्थ मठ असून त्याला लागूनच एका इमारती मध्ये जुगाराचा अड्डा व मटका बाजार चालू असून हे दोन्ही धंदे कित्येक वर्षा पासून चालू आहेत, अनेक संघटना पत्रकार समाजसेवक यांच्या तक्रारी असतानाही अद्यापही हा धंदा बंद केला जात नाही. तसेच मटका बाजार, जुगाराचा अड्डा चालवणारे मालक हे अनडरवल्ड गुंडाचे समर्थक असल्याने हा धंदा अद्याप बंद होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे,दोन वरिष्ठ अधिकारी यांचे कार्यालये हे दोन नंबर धंदे चालतात अगदी जवळ आहेत तरी देखील पोलीस प्रशासन हे धंदे बंद करण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांना काय सुरक्षा देऊ शकतील असे प्रश्न समोर येत आहेत. मा. सहाय्यक पोलीस उपायुक्त यांनी आचार संहिता लागू होण्याचा अगोदर हे धंदे बंद करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.