
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, मालेगाव । निमगाव निंबाईती रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका म ालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार झाले. तालुका पोलिसांनी अज्ञात वाहनचालका विरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
गोरख दावल जगताप (४४) व भाऊसाहेब त्र्यंबक माळी (४५) दोघे रा. सुकापूर वस्ती, निंबाईती हे दोघे एमएच ४१ बीके ९०४९ या दुचाकीने निंबाईती कडे येत असतांना त्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्याएमएच ४१ एयु ४४०४ या मालवाहू वाहनाने धडक दिली.
या धडकेत गोरख जगताप व भाऊसाहेब माळी हे दोघे गंभीर जखमी झाले होऊन मयत झाले. या प्रकरणी लक्ष्मण दावल जगताप (४२) रा. सुकापूर वस्ती, निंबाईती यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुका पोलिसांनी अपघातानंतर वाहन सोडून पसार झालेल्या वाहनचालका विरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोउनि भदाणे हे तपास करीत आहेत.