
राहुरी पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकास पंधरा
हजारांची लाच घेताना अॅंटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले*
अहमदनगर(प्रतिनीधी):-नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकास पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ज्ञानदेव नारायण गर्जे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राहुरी पोलिस स्टेशन, राहणार भाग्योदय रो हौसिंग सोसायटी, तपोवन रोड,राजबीर हाॅटेल समोर, मुकबधीर विद्यालया जवळ, अहमदनगर. तक्रारदार हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे “आय एम मोटवानी वाईनशाॅप” येथे नोकरीस आहेत. ते लिकरचा सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या मोटवानी वाईनशाॅप मध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकावर व तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्यांच्या ग्राहकावर पोलिस कारवाई न करण्यासाठी सदर पोलीस उपनिरीक्षकाने दरमहा 20,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोड करून 15000, रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारलीही .सदर रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लोकसेवक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.