A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

महाराष्ट्र. शिक्षकांसाठी नवा नियम लागू…

शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours

लातूर प्रतिनिधी.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शिक्षकांचे किमान तास निश्चित करण्यात आलेले आहेत. या नवीन पत्रानुसार शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दररोज अडीच तास जादा द्यावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २००९ अन्वये शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला शाळेतील कामाचे तास व शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. यात प्रत्येक शिक्षकासाठी दर आठवड्याला पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे ४५ तास निश्चित केले आहेत. यात शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश असेल, पाठाची तयारी करण्यासाठी दररोज १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे देणे आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, १ मार्च ते ३० एप्रिल २४ अखेरपर्यंत शालेय वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १२.४५, तर शनिवारी सकाळी ७.२५ ते सकाळी ११.३० अशी राहणार आहे. मात्र शिक्षकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ३.१५ तसेच शनिवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे.दररोजच्या अडीच तासात शिक्षकांनी पाठासाठी मुद्देनिहाय माहिती संकलित करावी लागेल. त्याचबरोबर अध्ययन व अध्यापनविषयक साहित्य तयार करणे, पाठाचे टाचण तयार करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनविषयक नोंदी, तंत्रे विकसित करणे, प्रत्यक्ष मूल्यांकन करणे, मुलांना शिकविण्याच्या दृष्टीने चांगले ज्ञानयुक्त पुस्तके वाचणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. अध्यापनाचे तास व पाठाच्या तयारीसाठी असलेले तास कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही. प्रभावी अंमलबजावणी करावी, असे चारही तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांनी विरोधाचे अस्त्र उपसले त्याचा उपयोग झालेला नाही.

नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबवा

Related Articles

जिल्हा परिषद

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!