
ठाणे प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात झाले पाहिजे या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे 10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केला आहे सगे – सोयऱ्यांच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत व सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे आंदोलन करून न्याय मिळण्यासाठी मराठा समाज तयार आहे शनिवारी होणारा रास्ता रोको शांततेत आंदोलन करा राज्यामध्ये जिथे तिथे शक्य आहे तिथे त्यांनी सकाळी ११ ते ०१ या वेळेत रस्ता रोको करा त्यानंतर आंदोलन नका करू उद्यापासून रास्ता रोको होणार नाही त्यानंतर धरणे आंदोलन होणार आहे प्रत्येक गावात शहरात धरणे आंदोलन करायचा आहे असे जरांगे पाटील म्हंटले आहे व त्याचे पडसाद काल ठाणे जिल्ह्यात उमटा दिसत आहेत.
शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठाण्यामध्ये कॅडबरी नाका येथे रास्ता रोको करण्यात आला होता ठाणे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन राबोडी पोलीस स्टेशनला नेण्यात आले व दोन तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवल्यानंतर आंदोलकर्त्यांना सोडण्यात आले शुक्रवारी पोलिसांकडून आंदोलकांना १४९ ची नोटीस दिली होती तरीही आंदोनकर्त्यांनी आंदोलन यशस्वी पार केल्याचे दिसून येत आहे आंदोलन करण्यासाठी संख्याबल लागत नाही समाजाबद्दल तळमळ असावी लागते जरांगे पाटील म्हणतील तसे आम्ही आंदोलन शांततेने पार पाडले आहे व आंदोलन करतच राहणार पाटलांचा शब्द आमच्यासाठी शेवटचा शब्द असेल अस म्हणत आंदोलकांनी आपली भूमिका मांडली
मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांसाठी लढा देत आहेत व त्या लढ्याला ताकद देणे हे आमचे कर्तव्य आहे आम्ही शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहू – मराठा क्रांती मोर्चा ठाणे