A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेराजस्थान

राजस्थानमध्ये शाळेत मीडिया वर बंदी

राजस्थान: राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये माध्यमांच्या प्रवेशावर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, शाळेच्या परिसरात कोणत्याही माध्यमांसह बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक ललित कुमार यांनी जारी केलेल्या आदेशात, शाळेच्या परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे, मुलाखत घेणे आणि लाइव्ह स्ट्रीमिंग करणे यासाठी कोणत्याही माध्यमांना परवानगी दिली जाणार नाही.

या निर्णयानंतर माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत तसेच सरकारी शाळांमधील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्ती आणि इतर संबंधितांकडून या आदेशावर प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. जनतेचे म्हणने आहे अश्याने सामान्य जनतेचा आवाज दाबला जात आहे.

वार्ताहर कृष्णा इंगोले

Related Articles
Show More
Back to top button