A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरे

महिला व नागरिकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य

*महिला व नागरिकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य*........... अकोला जिल्ह्यात नव्यानेच आणि पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती मिळालेले जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनचे प्रभारी व विविध विभाग प्रमुखांची पहीलीच गुन्हे आढावा बैठक काल घेतली त्यात त्यांनी गोवंश तस्करी, महीला सुरक्षा आणि नागरिकांच्या जिवीत्वाच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्याबाबत निर्देश दिले आहेत. शुक्रवारी पदाची सूत्रे हाती घेताच काल शनिवार दि.२४/०५/२०२५ रोजी नव्यानेच आलेले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हया तील पोलीस स्टेशन तसेच विविध शाखा यांच्या कामकाजा बाबत आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक आढावा घेण्यात आला. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी स्वतः बाबतीत ओळख करून देवुन आपल्या पो.स्टेच्या हद्दीबाबत तसेच पो.स्टेच्या कामकाजाबाबत व ईतर आवश्यक माहितीबाबत नुतन पोलीस अधीक्षकांना अवगत केले. या आढावा बैठकी दरम्यान महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, महिला विरुध्द अपराध करण्याऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी विशेष उपाययोजना कराव्यात. तसेच अपघातामधील जखमी यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्याकरीता उपाययोजना कराव्यात. युवा वर्गामध्ये नशामुक्ती करण्यासाठी अमली पदार्थ संबंधाने प्रभावी कार्यवाही करण्यात यावी तसेच अवैध शस्त्रास्त्र सबंधाने प्रभावी कार्यवाही करण्यात यावी.गोवंश चोरी, गोवंश तस्करी, याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. जिल्हयात सर्वच प्रकारच्या अवैध धंदे विरोधात प्रभावी कार्यवाही करण्यात यावी. व्हीजीबल पोलीसींग,नाईट गस्त दरम्यान क्यु.आर. कोड स्कॅनिंग, सराईत गुन्हेगारावर एमपीडीए, मोक्का, कायदया प्रमाणे तसेच तडीपार व जेल मधुन सुटलेले आरोपीवर योग्य प्रतिबंधक कार्यवाही करणे बाबत महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.तसेच वाहतुक नियमांचे उल्लघंन करणा-या वाहनचालकांविरूदध प्रभावी कार्यवाही करण्याबाबत तसेच शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय परिसरातील तंबाखुजन्य पदार्थावर विक्री करणारी मंडळी यांच्याविरूदध कठोर कारवाइ करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे तात्काळ प्रभावाने निराकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे सायबर गुन्हयाबाबत दखल घेवुन तपास करण्यात यावा अशा सुचना नूतन पोलीस अधिक्षक यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत. जिल्हयात सण,उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यस्थेची परिस्थीती संवेदनशिलतेने हाताळुन शांतता सुव्यवस्था अबधित राखावी याबाबत निर्देश देण्यात आले. सदर आढावा बैठकीकरिता सर्व विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी,ठाणेदार तसेच सर्व शाखा प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. शंकर शेळके पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी अकोला जिल्हा पोलीस दल यांनी ह्या बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!