A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरे
Trending

प्रेस नोट शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार   प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रेस नोट शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार   प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रेस नोट

शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार  
प्रलंबित अर्ज सादर करण्याचे आवाहन
नागपूर, दि. 28 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज असूनही नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 155 इतक्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज अद्याप सादर केलेले नसून 7 हजार 287 इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे समाज कल्याण विभागाने व इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वारंवार सुचित करुनही महाविद्यालयांनी याकडे कानाडोळा केल्या असल्याने इतर मागास बहुजन कल्याण विभाग आता अशा महाविद्यालयांवर कार्यवाही करणार आहे. ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर न केल्यास त्यांच्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर महाडीबीटी संकेतस्थळावर सन 2023-24 सत्राकरीता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी 30 जून 2024 अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2023-24 मध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या संर्वगाचे 21 जून 2024 अखेर 85195 अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यापैकी इतर मागास बहुजन कल्याण, नागपूर कार्यालयाने 71,198 इतके अर्ज मंजुर केलेले आहेत. तर 7,287 इतके अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलंबित असल्याने त्यावर इतर मागास बहुजन कल्याण, 
नागपूर कार्यालयास कार्यवाही करता आली नाही.
            महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक राजेंद्र बुजाडे यांनी केले आहे.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!