उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम संपन्न

संजय पारधी बल्लारपूर
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम संपन्न
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर व तालुका क्रीडा समिती बल्लारपूर तर्फे आयोजित दिनांक ३मे ते २३मे २०२४रोज २० दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर (विसापूर) येथे घेण्यात आले होते.यात एकूण १४०विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर शिबिराचे समारोप दिनांक २३मे २०२४ रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला मुख्य अतिथी मा. श्री चंदनसिंग चंदेल (माजी अध्यक्ष- वन विकास महामंडळ म.रा.) मा.श्री हरीश शर्मा(जिल्हाअध्यक्ष-भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर) इंजी.श्री देवेंद्र वाटकर(सचिव -भाजपा शहर,बल्लारपूर) श्री अरुण वाघमारे (माजी नगरसेवक) तसेच श्री वैभव जोशी(अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूर) प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराचे आयोजक तथा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बल्लारपूर तालुक्याचे क्रीडा संयोजक श्री किशोर मोहुर्ले सर यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविकता श्री गुलाम अहमद सर तर आभार प्रदर्शन श्री स्वप्निल डंभारे सर यांनी केले. प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, शिवकालीन मर्दानी आखाडा, क्रिकेट, व फुटबॉल ह्या खेळांचे शिक्षण देण्यात आले. सोबतच श्री सुरेश बोडके सर व टीम योग नृत्य परिवार, चंद्रपूर तर्फे सर्व विद्यार्थ्यांना योग नृत्य (झुंबा) प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रशांत सर व त्यांचे टीम यांनी एक नृत्य प्रस्तुत प्रस्तुत करून केले.सोबतच विद्यार्थी व प्रशिक्षण यांनी शिवकाली मर्दाना आखाड्याचे प्रात्यक्षिक सादर केले.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता
रितेश निरांजने, प्रमोद रामिल्ला, रोहित शर्मा,प्रशांत पिंपळे,विवेक शर्मा,संदीप राय, मनोज डे, परवेज खान,स्नेहल खरे, तुषार आत्राम,कोमल जंजरला, स्वप्निल ढोडरे इत्यादींनी परिश्रम घेतले.