
यातील आरोपींनी संगनमत करून रेती डेपो येथून रेती टी.पी पेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक करताना दिसून आले. म्हणून पो.स्टे सावनेर येथे अप.क्र 482/2024, कलम 379,109 भां.द.वि सहकलम 48(8)महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याकडे तपासादरम्यान (१) ट्रक मध्ये अतिरिक्त भरून असलेली रेती 1.80 ब्रास किंमत 10,800/-, रु. (२)टाटा हायवे ट्रक किंमत १०,००,०००/- रू. (३)दोन्ही ट्रक चालकांचे मोबाईल किंमत ४०००/-,३०००/- असे एकूण मिळून ७०००/- रू. एकूण १०,१७,८००/- रू.चा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार(भा.पो.से), मा अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, मा. श्री.अनिल म्हस्के सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे सावनेर ठाणेदार पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर,स्वप्नील गेडाम, माणिक शेरे, नितेश परखड, निसार शेख पोलिस स्टेशन सावनेर यांनी तपास केलेला आहे.