
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव : आगामी रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, चैत्रोत्सव, यासह विविध सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिस दलातर्फे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा दृष्टीने गुरुवारी (ता. ४) सायंकाळी सशस्त्र संचलन करण्यात आले.
शहर नियंत्रण कक्ष आवारातून संचलनास सुरुवात जाली. सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, सचिन गुंजाळ, यांनी नेतृत्व केले. पथसंचलनात सीआरएसएफ तुकडीतील दोन अधिकारी, ४८ अंमलदार आठ पोलिस निरीक्षक, ५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एटीटी हायस्कूल, किदवाई रस्ता, मोहम्मद अली रोड, दरेगाव चौकी, अंजुमन चौक, नेहरु चौक, किल्ला पोलिस ठाणे, गुळबाजार, रामसेतू, महात्मा फुले रस्ता, संगमेश्वर, मज्सिद, दत्त मंदिर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, या मार्गाने नियंत्रण कक्ष आवारात संचलन समाप्त झाले. संचलनात सीएसआरएफच्या पथकाचे जवान, शस्त्र साहित्य व वाहनांसह सहभागीझा ले होते.
पथकाला शहराची माहिती
पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या सूचनेनूसार अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदशनाखाली संचलन झाले. शहरातील सण, उत्सवांच्या बंदोबस्तासाठी सीआयएसएफ तुकडीतील दोन अधिकारी, ४८ अंमलदार येथील नियंत्रण कक्षात हजर झाले. त्यांची हजेरी व नोंद घेण्यात आली. त्यानंतर या पथकास सहाय्यक अधीक्षक तेगबिरसिंग संधू व यांनी परिस्थितीची माहिती दिली.