थाणेमहाराष्ट्र

गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालंआहे.

ठाणे:- गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालंआहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती.

पंढरीशेठ यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज होती. पंढरीशेठ जिथे असतील तिथे गर्दी आपोआप जमायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पंढरीशेठ यांच्यावर बरीच गाणी देखील बनली होती. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!