
(विशेष मत)मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षातील मराठा नेते मौन धारण करून का बसले आहेत ह्या बाबत चिंतन केले पाहिजे, सर्वच पक्षात मराठे आमदार खासदार जास्त संख्येने आहेत ते मराठा आरक्षणाचा प्रस्ताव बहुमताने कोणत्याही दुसर्यांच्या आरक्षणाला लावता पारित करू शकतात,तरी देखील मराठा आरक्षणास सत्ताधारी व विरोधी पक्ष विरोध स्पस्ट पणे दाखवत नाहीत, कारण त्यांचे येणाऱ्या निवडणुकीत पानिपत होईल किंवा नाही अशी भीती त्यांना भेडसावत आहे जरांगे नि सर्वात पहिले जे नेते त्यांच्या भेटीला येतात आणि त्यांची समजूत काडून वेळ काडू पानची भूमिका घेणाऱ्या पाशाची वकिली करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून त्यांचे जे ध्येय आहे जो लडा उभा केला आहे त्याला कसे यश येईल याची रणनीती अखने याचेवर भर देणे आताच्या वेळेला अति महत्वाचे आहे, सर्वच मराठा समाजातील नेत्यांनी पक्ष बाजूला ठेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला तर इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का नलागता आरक्षण केंद्र सरकारला देणे भाग आहे. आज मराठा समाज ऐकताकतीने एकजूट होऊन रस्त्यावर उतरला आहे, परंतु शोकांतिका आहे कि केंद्रात व राज्यात ज्यांचे सरकार आहे ते भांडवलशाही समजविरोधी यांचे आहे. यांना जागा दाकवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मतदान करतांना पक्ष किंवा स समजाचा उमेदवार बघून मतदान करू नका. करण येणारा काळ हा संघर्षाचा काळ असणार आहे हा संघर्ष आपल्या पुढच्या युवा पीडीच्या भवित्या साठी कठीण असणार आहे संविधानिक आरक्षण हवे असणार तर ते कायमचे राहील आश्वासनिक आरक्षण तुम्हाला सतत लाडात देऊन टिकवावे लागेल. मराठा समाजाने आता पुढाकार घेऊन येणाऱ्या निवडणुकीत एक देशात आणि राज्यात नवीन समीकरन जुळवून आरक्षणा करिता योग्य उमेदवारांना निवडून आणणे गरजेचे आहे.