
सोलापूर : भारतातील मानाची कुस्ती स्पर्धा असलेल्या हिंदकेसरीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या पैलवानाने बाजी मारली. हिंदकेसरीची गदा महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटील याने पटकावली. सोलापूर जिल्ह्याचा असलेला समाधान पाटील २०२४ चा हिंदकेसरी ठरला. त्याने दिल्लीचा पैलवान बोलू खत्रीचा पराभव केला.
सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समाधान पाटीलने हिंदकेसरी पटकावल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यंदाचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी सुद्धा मोहोळ तालुक्यात मिळाल्याने मोठा उत्साह आहे. हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रात येणार की दिल्लीत याची उत्सुकता कुस्ती शौकिनांना होती. पण सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या पैलवानाने गदा पटकावली.
जाहिरात
संबंधित बातम्या
ब्रिजभूषण यांना मोठा धक्का, कुस्ती महासंघ निलंबित; केंद्र सरकारचा निर्णय
कुस्तीपटू बजरंग पुनियाने उचललं मोठं पाऊल, घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय
कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने का सोडली कुस्ती? स्वतः सांगितलं कारण
पैलवान शिवराज राक्षे दुसऱ्यांदा बनला महाराष्ट्र केसरी
तेलंगनात हिंदकेसरी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावलं. २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके हिंदकेसरी ठरला होता. त्याने हरयाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला होता. अभिजीत कटकेने २०१७ मध्ये महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद मिळवलं होतं
समाधान पाटीलने आतापर्यंत मुख्यमंत्री केसरी गदा, मुंबई महापौर केसरी दोन वेळा विजेता, सोलापुरातील मानाची असणारी सिद्धेश्वर केसरी स्पर्धा दोन वेळेचा मानकरी, मोहोळ येथील नागनाथ केसरी स्पर्धा तीन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. याशिवाय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतही सहभागी झाला आहे.
सोलापुरातील श्रीकृष्ण आखाड्यात समाधान पाटील सराव करत होता. सोलापुरातील सुप्रसिद्ध कुस्ती वस्ताद भरत मेकाले यांचा समाधान पाटील पठ्ठ्या आहे. महाराष्ट्रासह देशात कुस्ती क्षेत्रातील नावाजलेला अशा या पैलवानाने हिंदकेसरीची गदा पटकावत सोलापूरसह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच केलीय.
News18 मराठी
व्हॉट्सअॅप चॅनलला फॉलो करा
टॉप व्हिडीओज
4/5
जेव्हा मनोहर जोशी स्वत: चप्पल घेऊन आले; शिवसैनिकाने सांगितला ‘तो’ किस्सा
5/5
कोणत्या मिरच्यांपासून बनते कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला चटणी? पाहा Video
1/5
देशभरातील 75 वाद्यांचे एकाच सादरीकरणात एकत्रित वादन; अनोख्या सोहळ्याचा Video
2/5
उन्हाळ