
लातूर प्रतिनिधी.Dhule News धुळे : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Shikant Dhiware) यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडविले आहे. केंद्रीय आपत्कालीन सेवेला संथ प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कंट्रोलला जमा करण्यात आले आहे. यामध्ये धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस (Dhule Police) ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.