
“आवाज महाराष्ट्राचा” पुरस्काराने ढूस परिवरातील तिन पिढ्यांच्या सन्मानाची परंपरा राखली..!
– आप्पासाहेब ढूस.
देवळाली प्रवरा – दि. १५/०२/२४
देवळाली प्रवरा येथील सुप्रसिद्ध रील स्टार वैभव आप्पासाहेब ढूस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते आवाज महाराष्ट्राचा हा मुंबई येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून वैभव चे अभिनंदन होत आहे.
या विषयावर आमचे प्रतिनिधीशी बोलताना वैभव चे वडील आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की,
दि राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा वैभव चे आजोबा व आमचें वडील कै. भिमराज रामजी ढूस यांचा घरामध्ये असलेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांचे सोबतचा फोटो पाहून माझाही राज्याच्या मुख्यंत्र्यांसोबत फोटो असावा असे मलाही खूप वाटायचे..
आणि, कर्म धर्म संयोगाने सर्वांच्या सहकार्याने माझे हातून आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी क्रीडा प्रकारात घडलेल्या कामगिरीमुळे राज्याचे मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील , मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आशा सर्व तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना वारंवार भेटण्याची व त्यांचेसोबत फोटो काढण्याची संधी मला मिळाली. आणि आपोआप बालपणीची ती सुप्त इच्छा पुर्ण झाली. तदनंतर..,
आज.., आमचे चिरंजीव वैभव आप्पासाहेब ढूस याने स्वतःच्या आवाजाच्या जादूने समस्त मराठी मनांना भुरळ घातली आहे.. व एक सुप्रसिद्ध रिल स्टार म्हणून राज्यात स्वतःचे नाव कमविले आहे. त्यामुळे कीत्येक वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविलेले तसेच माजी केंद्रीय मंत्री असलेले आणि सर्वांचे आदरणिय व राजकारणातील जेष्ठ असलेले व्यक्तिमत्व पद्मविभूषण आदरणीय शरजचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते नुकताच वैभवला आवाज महाराष्ट्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल वैभव चे ढूस परिवाराचे वतीने विशेष अभिनंदन.. त्यास कारण की..,
आमचे वडील कै. भिमराज रामजी ढूस यांचे नंतर मुख्यमंत्री पदासारख्या राज्यातील सर्वोच्च राजकीय पदावरील व्यक्तीला भेटण्याची किंवा त्यांचेकडून सन्मानित होण्याची सलग तिसऱ्या पिढीमध्ये परंपरा वैभवने कायम राखली आहे. त्याबद्द्ल वैभवला धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडेच आहेत.