A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedक्राइमदेशमहाराष्ट्र

मोटर सायकल चोरून विकणारे दोघेही गजाआड

परिसरातून मोटरसायकल जोडणारे दोघेही आरोपी स्थानिक गुन्हेशाखेकडून गजाआड

मालेगाव/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : शहरासह सटाणा, चांदवड, येवला, नाशिक, जळगाव परिसरातून मोटरसायकल चोरून त्या विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. या कारवाई चोरीच्या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या पाच जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडील 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली.

       शहरातील इस्लामपुरा भागात दुचाकी वरून फिरणाऱ्या आखलाख अहमद इम्तियाज अहमद (३४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीचे कागदपत्रे मागितली. त्यावेळी  दुचाकी ची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अहमद अब्दुल रा. संगमेश्वर याच्या मदतीने मालेगाव सह सटाणा, येवला, चांदवड, नाशिक, जळगाव या भागातून दुचाकी चोरण्याची कबुली दिली. त्याने या दुचाकी निसार अहमद अक्सर हुसेन रा. देवीचा मळा, मुजीब अहमद, जमील अहमद रा. संगमेश्वर, भिकन दादामीया पिंजरी रा. दरेगाव, सोयब अजहर, मोहम्मद शोएब इद्रीस यांना विकल्याची कबुली दिली.

    पोलिसांनी या पाच जणांकडून तेरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी तेजवीर सिंग संधू, सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चेतन सवतसरकर, संतोष हजारे, सुनील पाडवी, प्रदीप बहिरम, देवा गोविंद, गिरीश बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली. या चोरट्यांकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related Articles

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!