
महाराष्ट्र छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकावर 15 ऑगस्ट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पाहणी केली. मंत्र्यांचा ताफा थेट बस स्थानकाच्या आवारात धडकताच त्यांनी थेट बस स्थानकातील स्वच्छतागृहाची वाट धरली. तिथे पाऊल ठेवताच पसरलेली भयंकर दुर्गंधी, साचलेले घाण पाणी आणि स्वच्छतेचा पूर्णपणे उडालेला बोजवारा पाहून सरनाईक यांच्या रागाचा पारा चढला. दररोज हजारो प्रवासी ज्या ठिकाणाहून प्रवास करतात, त्या स्थानकातील स्वच्छतागृहांची इतकी भयानक आणि”प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर, अशी अवस्था पाहून एसटी महामंडळाचा अध्यक्ष असल्याची लाज वाटते असं प्रताप सरनाईक म्हणाले



