
दिनांक:-01/06/2024
प्रति,
मा.पोलिस निरीक्षक,
सदर पोलिस ठाणे,नागपूर शहर
महोदय,
सेवेशी विनंती आहे की, जिल्हा भूमि अभिलेख विभागाचे अधीक्षक अभय जोशी व त्यांच्या कार्यालयातील लिपिक अमोल दुधे यांनी पोलिस ठाणे सदर येथे दाखल असलेल्या अप क्रं:-279/2024 या गुन्ह्यातील आरोपी भूमाफियास मदत करण्याकरिता अधीक्षक अभय जोशी यांच्या समक्ष वरील गुन्ह्यातील आरोपीने अपील क्रं:- 00115/2022 च्या सूनावणी दरम्यान सन 1986 च्या नोंदणीकृत परवानाधारक स्टॅम्प वेंडर च्या स्टॅम्प पेपर वर सन 1970 सालीचा बनावट मृत्यूपत्राचा लेख नोटरी करून सादर केलेला होता. यावर आक्षेप घेत अपिलार्थिने सदर प्रकरणाची तक्रार अधिक्षक अभय जोशी यांनी त्यांचे कार्यालयातील लिपिक अमोल दुधे यांच्या मदतीने एका भुमाफियाला वाचविण्याकरिता कार्यालयातील मूळ अभिलेखातून बनावटी मृत्युपत्र गहाळ केला. त्यामुळे अधिक्षक अभय जोशी व लिपिक अमोल दुधे यांच्यावर संबंधीत पोलिस ठाणेमार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा मागणीला व निलंबनाच्या मागणीला घेऊन वरील विषयांकित आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
तसेच दुसरे प्रकरण असे की, मा. न्यायालयाची अवमानना केल्यामुळे भोंगळ कारभार करणाऱ्या नगर भूमापन अधिकारी शहर क्रं.3 श्रीमती स्वप्ना पाटील यांचे विरूध्द बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे कार्यवाही करण्याच्या मागणीला घेऊन मा. जिल्हाधिकारी नागपूर यांचे दालनासमोर दि.26/04/2024 व मा. विभागीय आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयासमोर दि.28/06/2024 रोजी पंकज लांजेवार यांच्या नेतृत्वात 200 ते 300 शिवसैनिकांसह आंदोलन करण्याचे ठरविले असून मला या आंदोलनाकरिता परवानगी देण्यात यावी ही नम्र विनंती
प्रतीलिपी:-
१) मा. जिल्हाधिकारी,नागपूर
२) मा. उपसंचालक, भूमिअभिलेख नागपूर
३) मा. अधिक्षक, भूमि अभिलेख नागपूर