31 मार्चला मालेगावात होणार विशाल हास्यरस कवी संमेलन; सादरीकरण करणार नामवंत हास्य कवी.
दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील सुप्रसिद्ध व नामवंत कवी कवयित्री उपस्थित राहणार असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर ,मालेगांव : येथील लायन्स क्लब व राजस्थान होळी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यामाने येत्या ३१ मार्च रोजी विशाल हास्यरस कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संजय पांडे व पवन टिबडेवाल यांनी दिली.
सटाणा रोडवरील यशश्री कंपाऊंडच्या प्रांगणात ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या हास्यरस कवीसंमेलनास प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रियाशील कार्यकर्ते स्व. सोहनलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या हास्यकवी संमेलनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते केले जाणार असून यावेळी लायन्स माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी, मिलींद पोफळे, राजेश कोठावदे, राज मुच्छाल, उषा तिवारी, राजू तापडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या हास्य कवी संमेलनाचे संचालन मध्य प्रदेशातील विनोदी कवी बलवंत बल्लू हे करणार असून दिल्ली येथील हास्य कवियित्री राधिका मित्तल, उत्तर प्रदेशातील प्रिती अग्रवाल, विकास बौखल व मध्यप्रदेशातील हास्य कवी अमित शुक्ला हे आपल्या कविता सादर करत हास्य कवी संमेलनात रंगत निर्माण करणार आहेत. या हास्य कवी संमेलनाचा शहरातील रसिक नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गोशाळा पांजरापोळ संस्था चेअरमन राजेंद्र शास्त्री, अशोक गुप्ता, गोविंद तोतला, दीपक काकाणी, कैलास बाहेती, देविदास पाटील, रमेश जाजू, विमल जैन आदींनी केले आहे.