
कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक शाखेने नो पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहणांना उचलण्याकरिता खाजगी कंपनी यांना कंत्राट दिले आहे, परंतु टोईंग वाहणावर काम करणारे कर्मचारी हे वाहन उचलताना कोणत्याही परकारची पूर्व सूचना नदेता वाहन चालक असतानाही वाहने जबरीने उचलून त्यांना कार्यालयात बोलावले जाते सदर त्या ठिकाणी टोईंग दंड वसुल करणारे कंत्राट दार हे वाहन मालकांकडून नियमा प्रमाणे असणारा दंड वसुल नकर्ता जादा पैश्यांची मांगणी करतात, कंत्राटी कामगार हे कोणत्याच परकारचे ओळखपत्र किंवा गणवेश घातलेले दिसत नाहीत पावतीनचा गोलमाल देखील होत आहे. ह्या कारणाने वाहन चालक मालक हे उदासीनता वेक्त करत आहेत, तसेच शहरात वाहतूक सुरळीत चालवी ह्या उद्देशाने वाहतूक नियंत्रण शाखा /कडोमपा यांनी मिळून खासगी रित्या स्वयंसेवक (वार्डन)यांची नियुक्ती केली आहे परंतु वार्डन हे त्यांचे काम सोडून वाहन चालकांना आडवून त्यांचा जवळून लाच मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, प्रत्येक वार्डन यांनी आपल्या फहायद्या करिता मोठया प्रमाणात लाच वसुली व्हावी म्हणून मोक्याचे चौक ठरवून घेतले असल्याचे समजते, सदर वार्डन यांच्या बदल्या करण्यात याव्यात व टोईंग गाड्या बंद करण्यात याव्या याचे निवेदन मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक उपशाखा कल्याण यांना देण्यात आले आहे, तत्वरित ह्या प्रकरणी योग्य कारवाई नही झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणचा ईशारा दिनांक २२/०२/२०२४ रिपाई (गवई) पक्षाच्या देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे असे निवेदनात नमूद केले आहे, तरी संबंधित विषयी कारवाई होईल अशी अपेक्षा निवेदन देणाऱ्यांनी वेक्त केली आहे.