
पत्रकार अरविंद कोठारी
दिवा: ५ जुलै रोजी मुंब्रादेवी कॉलनीतील प्रसिद्ध शाळेत, यस,यस, इंडिया हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात लहान मुले आणि मुली सहभागी झाली होती. त्यात मुलांनी वारकरी आणि मुलींनी मराठी साड्या परिधान केल्या आणि शाळेच्या व्हरांड्यात रॅली काढली. शिक्षकांनी मुलांना तुळशीमातेच्या रोपाची पूजा करताना आषाढी एकादशी का साजरी केली जाते आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले. यासोबतच, महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो. यामध्ये शाळेचे संचालक सूरज सरोज, शिक्षिका रोली मॅम, शीला मॅम, अंजली, अनुराग, रविप्रकाश, माधुरी, राधिका, पूजा आणि ममता शिक्षिका आणि मोठ्या संख्येने मुलांचे पालक उपस्थित होते.