
आज दिनांक 09/06/2024 रोजी भारतीय जनता पार्टी मध्य नागपूर महिला आघाडीतर्फे घोगरा (महादेव)येथे भेट देण्यात आली.
दिनांक 09/06/2024 रोजी सकाळी आठ वाजता गजानन मंदिर लाकडीपुल इथून बस निघाली. त्याचा श्रीगणेशा नारळ फोडून करण्यात आला. त्यासाठी रामभाऊ आंबुलकर, श्रीकांतजी आगलावे, किशोरजी पालांदुरकर, प्रमोदजी दहिकर, अमोलजी कोल्हे, बालाभाऊ जैन, राजेंद्रजी धकाते या सर्वांनी उपस्थित राहून उत्साह वाढवला.
यात महिला आघाडी मध्य नागपूर च्या अध्यक्ष कविताताई इंगळे, मंडळ महामंत्री दिपाली ताई नंदनवार,कल्पनाताई मानापुरे, माजी सभापती श्रध्दा ताई पाठक, तसेच संपर्क प्रमुख सविताताई उमाठे, मंडळ उपाध्यक्ष,मंत्री, वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड उपाधश्य, बेटी बचाव च्या संयोजिका,सहसंयोजिका,
आदिवासी मोर्चा अध्यक्ष, महामंत्री असे एकूण 50 जणाची उपस्थिती होती.
सर्वांनी आनंदानी उत्साहित मनाने घोगरा महादेवाचे दर्शन घेऊन परत आल्यावर संध्याकाळी बडकस चौक इथे पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.