A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेउत्तर प्रदेशछत्तीसगढ़झारखंडदेशमध्यप्रदेशराजस्थान

मौजा सोनपुर येथिल गावालगतच्या नाला खोलिकरणाच्या नावाखाली अवैधरीत्या रेती उत्खनन व डम्पिंग बंद करण्याबाबत.

महोदय,
वरील विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, आम्ही सोनपुर येथील मूळचे रहिवासी आहोत. संबधित ग्रामपंचायत सोनपुर येथील ग्रामसभा दिनांक 29/08/2023 सरपंच व सचिव ग्रामपंचायत बॉडीला विश्वासात न घेता नाला खोलीकरणाच्या संबधित गावकऱ्यांची आमसभा व विचार न घेता ठराव लिहिलेले आहेत.हा नाला अरुंद आहे तसेच खेकरानाला भरल्यानंतर त्याचे भरतीचे पाणी सोनपुर नाल्यात भरल्या जाते.जर नाला खोलीकरण केल्यास त्या नाल्यात सहा ते आठ फूट पाणी भरून राहण्याची शक्यता आहे.या नाला खोलीकरनाच्या नावाने अवैध वाळू व रेती उत्खनन सुरू केले आहे.नाला खोलीकरणाचा गावातील लोकाना कोणताही फायदा नाही.उलट यामुळे गावकऱ्यांचे,गावातील शेतकऱ्यांचे नुकसान आहे.हा नाला खोलकरनासाठी गावकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे.
करिता आम्ही सर्व गावकरी, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आपणास विनंती करतो की, आपण नाला खोलिकरणाचा आदेश रद्द करावा व नाला जसा पूर्ववत आहे तसा ठेवण्यात यावा जेणेकरून गावकरी व गावातील शेतकरी यांना सोयीचे होईल
प्रतीलीपी :-1)मा.वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब,वनपरिक्षेत्र खापा
2) मा.तहसीलदार साहेब,तहसील कार्यालय सावनेर
3) मा.पोलिस अधीक्षक साहेब, पोलिस स्टेशन खापा
4) मा. जिल्हापरिषद साहेब,जिल्हा परिषद नागपूर

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!