A2Z सभी खबर सभी जिले की

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय ला नॅक चे ‘बी प्लस ग्रेड’ प्राप्त

समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र :-
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक २० व २१ मार्च २०२४ रोजी नॅक समिती ने भेट दिली होती. या समिती मध्ये आई.जी.एन.ओ.यू दिल्ली चे चेयरमेन प्रो. कुलुगुरु डॉ.किरण हजारिका, देवांगीरी विद्यापीठ कर्नाटक चे सदस्य कोआर्डिनेटर प्रा.डॉ.रंगप्पा के.बी. आणि सदस्य माजी प्राचार्य,पं. एल. एम. एस. स्नातकोत्तर महा.उत्तराखण्ड चे डॉ.एन. डी. माहेश्वरी उपस्थित होते. या समिती ने प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण सह सर्व विभागातील प्राध्यापक आणि कोऑर्डिनेटर प्रा. डॉ. रजत मंडल यांचे सादरिकरण घेण्यात आले .त्यानंतर प्रत्येक विभागाला त्यांनी स्वतः भेट दिली आणि विभागाद्वारे ज्या कमतरता आहे त्या पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.
महाविद्यालयात समिती चे आगमन होताच एनसीसी चे लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे यांच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट नी मानवंदना दिली. तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेश चिताळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रभारी प्राचार्य डॉ. बी.डी. चव्हाण यांनी सुध्दा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या दोन दिवसाच्या कालावधी मध्ये महाविद्यालय चे माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांशी वैयक्तिकरित्या त्यांनी संवाद केला. माजी विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात होती आणि ते मोठमोठ्या पदावर कार्यरत असल्याचे लक्षात आले. एकंदरीत या दोन दिवसाच्या भेटी दरम्यान त्यांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही यापेक्षा आणखी पुढे जाऊन महाविद्यालयाला व संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शुभांगी भेंडे शर्मा यांचा मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात प्रत्येक राज्याचे ग्रुप डान्स मुले व मुलींद्वारे सादर केले. यानंतर प्रत्येक विभागातील प्राध्यापकांनी आपल्या विभागातील उत्कृष्ट माहिती सांगितली.
आज दिनांक १ एप्रिल रोजी महाविद्यालयाला ‘ बी ‘ प्लस हा ग्रेड नॅक द्वारे मुल्यांकरून देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संजय भाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेश चिताळे यांनी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य , कोऑर्डिनेटर , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि मान्यवरांचे आभार मानून अभिनंदन केले.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!