A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

तीन दुकानांना लागली आग. लाखोंचा माल जळून खाक

सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे यश.

महारष्ट्र: छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

वाळूज महानगर परीसरात रांजण गाव शेण पुंजी गावच्या मुख्य रस्त्या लगत असलेल्या मार्केट मध्ये तीन दुकानांनी अचानक रात्री पेट घेतला. झाले असे की, व्यंकटेश कवठेकर मसाला सेंटर, गणेश लडणे यांचे गणेश मोबाइल शोपी, अमजद खत्री यांचे धमाका रेडिमेड कपडा सेल या तीनही दुकाने सलग लागूनच आहेत. अमजद खत्री हे रात्री दहाच्या सुमारास आपले दुकान बंद करून घराकडे जायला निघाले अचानक त्यांच्या दुकानां मधून धूर आणि आगीचे लोंढे बाहेर पडताना दिसू लागले. हे दृश्य पाहून बघ्यांनी रस्त्याच्या कडेला गर्दी करण्यास सुरुवात केली. आमच्यात खत्री यांच्या दुकानाच्या आगीचे पडसाद शेजारी असलेल्या दुकानाला लागले. ही बाब अमजद खत्री यांना समजतात परत माघारी दुकानाकडे फिरले. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दल पोलीस प्रशासनाला पाचारण केले. रस्त्याच्या कडेला बघ यांची एवढी गर्दी जमली की गर्दीला पांगविण्यासाठी अग्निशमन दलाला गर्दीवर पाण्याचा मारा करावा लागला. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!