
डोंबिवली येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात परिसरातील रहिवाशीनचा विरोध असतांना देखील शव विच्छेदन विभाग केडीएमसी प्रशासनाने अखेर चालू केले, परंतु अपुऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्या मुळे उदघाटन झाल्या पासून एकही शवाचे विच्छेदन अद्याप करण्यात आले नसून, घाई गरबडीत मुख्यमंत्री यांच्या हस्ते रिमोट ने उदघाटन करण्यात आले असतांना देखील केडीएमसी प्रशासन आतापर्यन्त कोणतेच पाऊल उचलतांना दिसत नाही, ह्या बाबत नागरिकांना प्रश्न निर्माण झाला आहे, डॉक्टर व कर्मचारी नसतांना देखील स्थानिक नागरिकांच्या विरोधाला डावलून उदघाटन करण्यात आले, तरी देखील रुग्णालय प्रशासन ह्या विषयी गंभीरता घेत नसल्याचे समोर येत आहे. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात डॉक्टरांची एकीकडे गरज असतांना देखील बदल्या करण्यात येत आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्वरित डॉक्टरांची नियुक्ती करून शव विच्छेदन विभाग सुरळीत चालू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.