A2Z सभी खबर सभी जिले कीउल्हासनगरमहाराष्ट्र

सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ पायाने तुडवले

उल्हासनगर :- उल्हासनगरच्या कॅप नंबर ४च्या आशेळेपाडा भागात हरिओम स्वीट नावाच्या दुकानात धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हे दुकान येथे आहे .या मिठाईच्या दुकानात कारागीर समोसेसाठी लागणारे पीठ पायाने तुडवत असल्याचे एका येथे नेहमी याणाऱ्या एका ग्राहकाने पाहिले. या ग्राहकाने मोबाईल मध्ये या किळसवाण्या प्रकाराचे रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानावर धडक देत इथल्या दुकान मालकाला याचा जाब विचारला.
दरम्यान यापुढे दुकानात बनवले जाणारे साहित्य विकायचे नाही. पॅकिंग फूड विकायचे असे गावकऱ्यांनी या दुकान मालकाला समजावले. त्यानंतर दुकान मालकाने देखील झालेली चूक कबूल करत यापुढे असे होणार नाही असं गावकऱ्यांना सांगितलं .मात्र या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हे स्वीट मार्ट सुरु आहे. अनेक गावकरी याच दुकानातून मिठाई खरेदी करत होते. मात्र या दुकानदाराने गावकऱ्यांची फसवणूक केली असून आता हे दुकान या ठिकाणी चालू देणार नाही असा देखील पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Show More

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!