
मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या कॅम्प परिसरात नागरिक सोयी सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरले आहे. तसेच येत्या बहिणाभर नागरिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास मालमत्ता कर न भरण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाला देखील कळविला आहे.
शहरातील प्रभाग एक मधील असलेल्या कॅम्प परिसरात जवळपास 20 ते 25 कॉलनी ची नागरिक वसाहत असून गेल्या वर्षभरापासून नागरिक स्थळे सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव राहिला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत, ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग तुंबलेल्या गटारी अस्वच्छता या प्रमुख नागरिक तक्रारी आहेत येथे सुविधा प्रविण्यास मनपा प्रशासनाकडून डोळे झाक केली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच वर्षभरात साथीचे आजार वाढत असतानाही काही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नाही यासंदर्भात गेल्या वर्षभरात परिसरातील नागरिकांकडून मनपा प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी सह निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. यामुळे परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे यामुळे कॅम्प परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराविषयी साशंकता निर्माण झाली असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील मध्यवर्गीयांसह सामान्य नागरिकांची वसाहत असून परिसरात शासकीय कार्यालय देखील आहेत अशातच मनपा प्रशासनाकडून नागरिक सोयीसुविधा पुरविल्या जात नाही गेल्या वर्षभरात परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असूनही अद्यापही कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही याशिवाय दररोज घंटागाडी येत नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यामुळे परिसरातील नागरिकांची मनात तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया उमटत असून येत्या महिनाभरात नागरिक सोयी सुविधा पुरविल्या नाही तर मालमत्ता कर न भरण्याचा निर्णय परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविले आहे.
शहरातील अनेक ठिकाणाच्या मोकळ्या भूखंडांवर नागरिक कचरा फेकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून तो साफ करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली जात आहे.