राष्ट्रकवी संजय निकम ह्यांचा हॉर्वर्ड विश्व रेकॉर्ड
राष्ट्रकवी संजय निकम ह्यांचा हॉर्वर्ड विश्व रेकॉर्ड कवि संमेलनात विशेष प्रमुख अतिथी म्हणून सन्मान.

मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कवि संमेलनात विशेष प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र ह्यांना निमंत्रित करण्यात आले. बुलंदी संस्था, बाजपुर, उत्तराखंड या संस्थेचे संस्थापक विवेक बादल बाजपुरी ह्यांनी राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांचा परिचय करुन दिला. संरक्षक पंकज शर्मा यांनी संजयनिकम ह्यांचा विशेष अतिथी म्हणून सत्कार केला. सचिव मातृका बहुगूणा यांनी हॉवर्ड विश्व रेकॉर्ड कवि संमेलनाबाबत सर्वांना माहिती दिली. विश्वातील 55 देशातील नवोदित कवींनी या आंतरराष्ट्रीय हॉवर्ड कवि संमेलनात भाग घेतला. 1205 कवींनी सलग 220 तास आपआपल्या काव्यरचना सादर केल्या. ऑनलाईन सादरीकरण केल्याने प्रत्येक कवीला आपली रचना सादर करावयास सोयीचे झाले.
हॉवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड लंडनद्वारा जगातले सर्वात मोठे व्हर्च्युअल आंतर राष्ट्रीय विश्व कवि संमेलन 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत घेण्यात आले. यात जगातील 55 देशातील साहित्यीक कवींनी भाग घेतला होता. सर्वांना संस्थेतर्फे गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम जी यांच्या मेरा भारत हिंदी काव्यसंग्रहातील देशभक्तीपर कवितांनी जगातील 55 देशातील रसिकांवर भुरळ घातली आहे. त्यांनी आपल्या कवितांद्वारे साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. यामुळे देशाचा नाव लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशाची शान वाढली आहे. बुलंदी संस्थेतर्फे 2021, 2022,2024 ,या तीन वर्षांमध्ये तीन वेळेस हॉवर्ड विश्व रेकॉर्ड कवि संमेलन घेण्यात आले आहे. हा ही एक इंडिया गिनीज बुक वर्ल्ड रेकाॅर्ड आहे. बुलंदी संस्थेने हा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. यामुळे भारत देशाची मान गर्वाने उंचावली आहे.