A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेदेशमहाराष्ट्रराजनीति

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सटाणा शहरात मिळाला कडकडीत बंदला चांगला प्रतिसाद

सटाणा शहरात दिवसभर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

नाशिक/सटाणा, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्याकरिता शहरासह तालुक्यात रविवारी (दि.१८) कडकडीत बंद पाळण्यात आला.

       जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणास बसले असून शासनाकडून मात्र अद्यापही आंदोलनाची विशेष दखल घेतली जात नाही. त्यामुळे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवितानाच शासनाने या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी सटाणा शहरात रविवारी (दि.१८) बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी संघटना तसेच मेडिकल व्यवसायिकांनी या बंद आंदोलनास पाठिंबा दिल्याने सकाळपासून शहरातील सर्व दुकाने बंद होती.

        शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवला. सटाणा शहर व्यतिरिक्त आराई, तरसाळी, औंदाणे, वीरगाव या गावातही दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!