A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedदेशमहाराष्ट्रराजनीति

पिंपरखेड येथे शिवसैनिकांनी टोल नाका केला बंद

पिंपरखेड येथील महामार्गावर टोल वसुली करण्यात येत असल्याचे समजताच शिवसैनिकांनी टोल बंद करण्याचे निवेदन दिले..

     नांदगाव/नाशिक, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाही जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गांवरील (एन एच ७५३ जे) नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे टोल वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्याचे आ. सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह टोल बंद करण्याचे निवेदन देताच टोल प्रशासनाने सदर महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल करणार नसल्याचे जाहीर केले. 

      टोल व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा मिळाल्यानंतर जळगाव ते चांदवड संपूर्ण मार्ग सिमेंटचा बनवण्यात आला. मात्र अजूनही महामार्गांवर ज्या सुविधा वाहन चालकांना उपलब्ध केल्या जातात त्याची मात्र अजूनही पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यात प्रथमोपचार, शौचालय, बाथरूम, आराम गृह, रुग्णवाहिका, क्रेन, हवा भरण्यासाठी यंत्र, यासह अनेक सुविधा नसल्याचे दिसून आल्याने सदर टोलनाका तत्काळ बंद करावा असे निवेदन दिले. युवा सेनेची ही मागणी टोल प्रशासनाने तात्काळ मान्य करत टोल वसुली थांबवून टोल पूर्ण सुविधा दिल्यानंतरच सुरू केला जाईल असे जाहीर केले. यावेळी राजेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर कांदे, तालुका सेनेचे तालुका अध्यक्ष सागर हिरे, शहर प्रमुख सुनील जाधव, अय्याज शेख, महेंद्र गायकवाड, बापू जाधव, भावराव बागुल, भैय्या पगार, सचिन पगार, शशी सोनवणे, नितीन सोनवणे, गणेश हातेकर, गौरव बोरसे, अमान खान, मनमाड शहर प्रमुख योगेश इमले, उपाध्यक्ष मन्नू शेख, माजी नगरसेवक आझाद पठाण, गणेश कुमावत, प्रीतम पवार, बाळा काकळीज, मनीष बागोरे, वाल्मीक निकम, सचिन उदावंत, संदीप मवाळ, प्रथमेश बोरसे, अविनाश लुटे, जीवन भाबड, आबा बोरसे, चेतन बोरसे, पवन झाडगे, गोपी मोरे, गोकुळ मोरे, विकी बोरसे, सोनू, दीपक, गणेश पवार, जीवन भाबड, आदींसह शेकडो युवा सेनेचे कार्यकर्ते हजर होते. 

 

 

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!