
संजय पारधी बल्लारपूर महाराष्ट्र
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रीडा विभाग आणि बल्लारपूर बहुउद्देशीय अँड कल्चरल असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षारोपणा करिता चंद्रपूर जिल्ह्याचे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद आवते तसेच वरिष्ठ व्हॉलीबॉल खेळाडु शांताराम वाडगुरे ,अशोक सोनपरोते, बोबडे सर ,चंद्रकांत मैदमवार, सुरेश गोडे,रवी अंसुरी,बलवे आणि इतर सर्व खेळाडू उपस्थित होते . यावर्षी देशभरात उन्हाळ्यात उष्णता वाढलेली होती .भविष्यामध्ये उष्णता वाढ थांबवण्यासाठी योग्य नियंत्रण आवश्यक आहे. सगळ्यांनी झाडे लावणे व संगोपन करणे आवश्यक आहे असे मान्यवरांनी उद्बोधनात सांगण्यात आले. सर्वांनी आपापल्या वाढदिवसाला आपल्या ठिकाणी एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन आणि संरक्षण करावे असे सांगितले.