
शक्तिमातानगर खरबी नागपूर येथे दिनांक 24/05/2024 ते 26/05/2024 दरम्यान दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसांची ‘महिला सक्षमीकरणासाठी योग 2024’चे आयोजन शिवशक्ती हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरात सलग तीन दिवस पतंजली योग समितीचे संगठन मंत्री इंजि.संजय खोंडे, रिसर्च स्कॉलर आय.एन.ओ चे को- कन्व्हेनर म.रा यांनी महिलांना विविध आरोग्य समस्यांवर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योग, प्राणायाम,मुद्रा ॲक्युप्रेशर, शंखनाद, टाळींचे महत्त्व शुध्दीक्रिया औषधीय वनस्पतींची ओळख व उपयुक्तता इत्यादी तसेच भारत सरकार आयुष मंत्रालयाचा प्रोटोकॉल याची इत्यंभूत माहिती देऊन प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यांच्यात निरोगी जिवणाप्रती उत्साह निर्माण केला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात सौ.कविता रेवतकर, श्री.हेमंत सेलोकर यांनी अथक परिश्रम घेतले.