A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

चोरीच्या गाड्या विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ दुचाकी हस्तगत

पनवेल, कामोठे व नवी मुंबई परिसरातील दुचाकींची चोरी करून, त्या खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे.

  1. पनवेल, कामोठे व नवी मुंबई परिसरातील दुचाकींची चोरी करून, त्या खुल्या मार्केटमध्ये कमी भावात विकून त्या पैशावर अय्याशी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या तीन आरोपींकडून खांदेश्वर पोलिसांच्या पथकांनी लाखो रुपयांच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींमध्ये ५ बुलेट चा देखील समावेश आहे.
जगदीश चुन्नीलाल माळी (वय २४) राहणार पुणे, प्रवीण रामलाल सीरवी (वय २५) राहणार विचुंबे गाव पनवेल, अरविंदकुमार भवरलाल हिरागर (२४) राहणार कामोठे असे पकडलेल्या तीन संशयीत आरोपींची नावे आहेत. हे तिन्ही संशयीत आरोपी दिवसा खाजगी नोकरी करायचे आणि रात्री दुचाकी चोरणाऱ्याची कामे करायची या तिन्ही आरोपीकडून खांदेश्वर पोलिसांनी जवळपास ११ दुकाची जप्त केल्या आहेत, या दुचाकीमध्ये ५ बुलेट चा देखील सहभाग आहे.
या तीन संशयितांपैकी कामोठे वसाहतीमध्ये राहणारा अरविंदकुमार हिरागर हा पनवेल तसेच नवी मुबई परिसरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. तसेच विचुंबे येथील प्रवीण सिरवी हा देखील खासगी सप्लायर म्हणून काम करायचा. हे काम करताना, सोसायटीच्या आवारात तसेच रेल्वे स्टेशन च्या आवारात पार्कंग करून ठेवलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवून असायचे. रात्री याच दुचाकी चोरून पोबारा करायचे, अश्या प्रकारे, या संशयीत आरोपींनी खांदेश्वर पोलीस स्टेशन आणि कामोठे तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरून नवी मुबई शहरात दहशत माजवली होती. या चोरांना पकडणे नवी मुबई पोलिसांसाठी आवाहन झाले होते.
या दुचाकी चोरी बाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चासकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक समिर बरकडे असे दोन पोलीस पथके तयार करून, गुन्ह्याच्या तपासाला सुरवात केली. तपास सुरू केल्या नंतर सर्वच गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून नवी मुबई, खांदेश्वर तसेच कामोठे शहरातील सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींच्या हालचाली शोधण्यास सुरवात केली आणि संशयीत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलीस पथकातील पोलीस हवालदार महेश कांबळे, भाऊराव बाचकर, धीरेद्र पाटील, उदय देसाई अमित पाटील तसेच अन्य पोलिसांच्या पथकांनी या दोन संशयीतांना नवीन पनवेल मधील शिवा कॉम्प्लेक्स येथुन अटक केली.
तिसऱ्या संशयीताला पुणे येथुन अटक केली. याची अधिक चौकशी केली असता, या चोरांनी या सर्व गाड्या पुणे, राजस्थान तसेच नवी मुबई परिसरात विकल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच जवळपास ११ दुचाकी राजस्थान, पुणे आणि नवी मुबई येथे जाऊन ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. या संशयीतांकडून जवळपास ११ गुन्ह्यांची उकल खांदेश्वर पोलिसांनी केली आहे. गाडी चोरण्यासाठी या संशयीतांना फक्त ३० ते ४० सेकंदाचा वेळ लागायचा. त्यासाठी ते पहिल्यांदा दुचाकीचे हॅन्डेल लॉक तोडायचे आणि चावीच्या जागी दुचाकी मधील वायरींग मध्ये बदल करून ती दुचाकी चालू करून पोबारा करायचे. यासाठी एका केबलची मदत संशयीत घेत होते. दुचाकी चोरणाऱ्या आरोपींमध्ये अवघ्या (२४ वर्षीय) डिलिव्हरी बॉयचा समावेश आहे. कामोठे वसाहतीमध्ये राहणारा हा डिलिव्हरी बॉय अरविंदकुमार सामानाची डिलिव्हरी करत सोसायट्या तसेच रेल्वे स्टेशनच्या आवारात पार्कीग करून ठेवलेल्या दुचाकींवर लक्ष ठेवायचा. रात्री अंधाराचा फायदा घेऊन मित्राच्या मदतीने त्याच दुचाकी चोरायचा. यांच्या अटकेमुळे अजूनही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खांदेश्वर पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहेत.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!